मुंबई- करण जोहरचं दिग्दर्शन असलेला 'कभी खुशी कभी गम' चित्रपट २००१ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, हृतिक रोशन, काजोल देवगण आणि करिना कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
'बोले चुडिया'ला ४०० मिलियन व्ह्यूज; करण म्हणतोय, माझ्या करिअरमधलं अविस्मरणीय गाणं - kabhi khushi kbhi gam
हे गाणं अविस्मरणीय असल्याचं कारणही करणने सांगितलं आहे. यानिमित्ताने मला पहिल्यांदाच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती, असं करणनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर चित्रपटाशिवाय सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता या चित्रपटातील 'बोले चुडिया' गाण्याला ४०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. करण जोहरने याबद्दलची माहिती देत हे आपल्या करिअरमधील सर्वात अविस्मरणीय गाणं असल्याचं म्हटलं आहे.
हे गाणं अविस्मरणीय असल्याचं कारणही करणने सांगितलं आहे. यानिमित्ताने मला पहिल्यांदाच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती, असं करणनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान बोले चुडिया हे गाणं फराह खाननं कोरिओग्राफ केलं होतं.