मुंबई- काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये जणू मीटू मोहिमेचं वादळच आलं होतं. या मोहिमेअंतर्गत अनेक मोठ्या कलाकारांचे आणि कलासृष्टीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे खरे चेहरे जगासमोर आले. मात्र, आता या प्रकरणात या व्यक्तींना क्लीन चीट मिळण्यास सुरुवात झाली आहे.
या जगापलीकडेही एक जग आहे; तुम्हा सर्वांचा हिशोब होईल, रंगोलीचा विकास बहलला टोला - sexual harassment
तुम्हा सर्वांचा हिशोब होईल. या जगापलीकडेही एक जग आहे, जिथे एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज कधीच दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही, असं ट्विट करत तिनं विकास बहल आणि अलोक नाथला टोला लगावला आहे.
अलोकनाथ यांच्या पाठोपाठ आता विकास बहललाही क्लीन चीट मिळाल्याचं वृत्त समोर येत आहे. यावर कंगनाची बहिण रंगोलीची प्रतिक्रिया आली आहे. तुम्हा सर्वांचा हिशोब होईल. या जगापलीकडेही एक जग आहे, जिथे एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज कधीच दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही, असं ट्विट करत तिनं विकास बहल आणि अलोक नाथला टोला लगावला आहे.
विकास बहलने बॉम्बे वेलवेटच्या प्रमोशन टूरदरम्यान आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका क्रू मेंबरने केला होता. तर अलेक नाथ यांच्यावर विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. ज्यानंतर रेणूका शहाणे यांनीदेखील अलोकनाथ यांच्यासोबत काम करताना आलेले वाईट अनुभव सांगितले होते.