मुंबई - कंगना राणावतने (Kangana Ranaut) 'धाकड' चित्रपटाच्या रॅप अप पार्टीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पांढऱ्या पारदर्शक ब्रालेटमध्ये दिसत आहे. कंगनाचे हे फोटो पाहून काही युजर्स वैतागले आहेत. त्यांनी कंगनाला टोमणे मारण्यास सुरुवात केली. तिच्या सनातन धर्माबद्दल ट्रोल करण्यात येऊ लागले. त्यानंतर तिने एक प्राचीन चित्र शेअर करुन युजर्सचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्राचीन कपडे परिधान केलेल्या एका महिलेचे चित्र शेअर केले. हे चित्र आणि कंगनाच्या फोटोत बरीच साम्य दिसतात. हे चित्र शेअर करीत तिने लिहिलंय, ''जे लोक मला सनातन धर्माचे ज्ञान देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही अब्राहमिक (Abrahamic )सारखं वागत आहात.''
काय म्हणाले युजर्स?
जेव्हा कंगनाचे पार्टीतील फोटो जेव्हा युजर्सच्या नजरेस पडले तेव्हा ते भडकले. एकजण म्हणाला, ''ती अनेकदा इतर स्टार्सना कपड्यांबाबत सल्ला देते आणि ती स्वतः ब्रालेटमध्ये असते.''