मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला एक ट्विटर पोस्ट महागात पडली आहे. तिने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचारावर भाष्य करणारीएक वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. यात तिने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटवरील तिचे खाते आता निलंबीत करण्यात आले आहे. ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये कंगनाने पश्चिम बंगालमधील राष्ट्रपती राजवट देण्याची शिफारस केली आहे. राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाभरात हिंसाचार वाढला आहे. याकडे आंतरराष्ट्रीय मीडियाचे लक्ष नाही. देशद्रोहीच देश चालवणार आहेत का? असा सवालही कंगनाने या व्हिडिओतून विचारला आहे. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती राजवट लागू केली होती तर मग आता बंगालमध्ये लागू करायला काय हरकत आहे असेही कंगनाने म्हटलंय.
यापूर्वी आज कंगना रणौतचे ट्विटर अकाउंट वादग्रस्त ट्विटची मालिका चालवल्यामुळे निलंबीत करण्यात आले आहे.