पोर्ट ब्लेअर - बॉलीवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी विविध कारणांमुळे किंवा तिच्या विविध वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. कंगना अंदमान निकोबारमधील काळा पाणी (सेल्युलर जेल) तुरुंगात पोहचली आहे. तुरुंगातील वीर सावरकर सेलला तिने भेट दिली. कंगनाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून कंगनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वीर सावरकर यांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या कोठडीत कंगना पोहचली. तिथे असलेल्या सावकर यांच्या चित्रासमोर ती नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले.
कंगनाने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अंदमान बेटावर असलेल्या काळा पाणी (सेल्युलर जेल) तुरुंगाला भेट दिली. यावेळी मी सावकरांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिथे गेले. ते दृश्य पाहिल्यानंतर मी हादरून गेले. अमानुषता शिगेला पोहोचलेली असताना सावरकरांच्या रुपात मानवता उच्च शिखरावर होती. सावरकर धैर्याने न घाबरता शिक्षेला सामोरे गेले. सावकरांना इंग्रजांनी एका लहानशा खोलीत बंदिस्त केले. समुद्राच्या मधोमध असलेल्या या लहानशा बेटातून पळून जाणे अशक्य होते. तरीही त्यांनी सावकरांना पायात साखळदंड घालून बंदीस्त केले. यावरून इंग्रजांचा ब्रिटिशांचा भ्याडपणा आणि सावकरांना किती घाबरत असावे याची कल्पना येते. तुरूंगातील ही खोलीच स्वातंत्र्याचे खरे सत्य आहे. मात्र, ते नाही जे आपल्याला पाठ्यपुस्तकांमधून शिकवले गेले, असे कंगनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.