मुंबई- सोशल मीडिया वरील विवादित पोस्ट संदर्भात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात वांद्रे कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. या संदर्भात अभिनेत्री कंगना व तिची बहीण रंगोली चंदेल यांना वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र , यास उत्तर देताना कंगना रणौत ही तिच्या घरातील एका लग्नकार्यासाठी व्यग्र असल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे कळवले होते. मात्र, पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्याकडून कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले असून १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
कंगना रणौतला मुंबई पोलिसांचे पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
बॉलिवूडमध्ये मुस्लिम कलाकार व हिंदू कलाकार यांच्यात मतभेद केला जात असल्याचा आरोप कंगना रणौतने सोशल मीडियावरुन केला होता. याविरुध्द न्यायालयाने तिच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्याकडून कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले असून १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
कंगना रणौत
काय आहे प्रकरण
अभिनेत्री कंगना रणौत हिने तिच्या ट्विटर अकाउंटवरून बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लीम तणाव असून मुस्लिम कलाकार व हिंदू कलाकार यांच्यात मतभेद असल्याचा आरोप केला होता. यामुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत याचिकाकर्ते मूनवर आली साहिल अश्रफ यांनी वांद्रे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस याचिकाकर्त्यांनी कंगना रणौत हिच्या सोशल माध्यमांवर तिने तिने केलेल्या विवादित पोस्ट संदर्भात माहिती देण्यात आली होती.
Last Updated : Nov 3, 2020, 1:25 PM IST