महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या 'क्वीन'ने मागितली पत्रकारांची माफी, मीडियाने टाकला होता बहिष्कार - kangana ranaut controversy

मी कंगनाला फोन केला होता आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल आमचं बोलणं झालं आहे. यावेळी कंगनाने एका ऑडिओ मेसेजद्वारे पत्रकारांची माफी मागितली आहे, असं एकता म्हणाली.

बॉलिवूडच्या 'क्वीन'ने मागितली पत्रकारांची माफी

By

Published : Jul 19, 2019, 6:15 PM IST

मुंबई- चित्रपट निर्माती एकता कपूर नुकतीच जयपूरच्या एका मंदिरात पोहोचली. याठिकाणी जाऊन तिने आपल्या आगामी 'जजमेंटल हैं क्या' आणि 'जबरिया जोडी' चित्रपटांसाठी प्रार्थना केली. दरम्यान आपण देवाकडे काय मागणं मागितलं, हे सांगण्यासाठी तिने माध्यमांशी संवादही साधला.

'जजमेंटल हैं क्या' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान कंगना रनौतचा पत्रकारांसोबत झालेला वाद सध्या चांगलाच गाजला आहे. ज्यानंतर काही पत्रकारांच्या गटाने कंगनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याबद्दल सवाल केला असता, मी कंगनाला फोन केला होता आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल आमचं बोलणं झालं आहे. यावेळी कंगनाने एका ऑडिओ मेसेजद्वारे पत्रकारांची माफी मागितली आहे, असं एकता म्हणाली.

बॉलिवूडच्या 'क्वीन'ने मागितली पत्रकारांची माफी

कंगना लवकरच 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार रावही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर याशिवाय 'पंगा' या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details