मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कलंक' चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात चित्रपटातील नवीन गाणी आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. यानंतर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जल्द ही छायेगा प्यार.. बहुप्रतीक्षित 'कलंक'चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित
आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निश्चितच या ट्रेलरविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असणार आहे. काही दिवस आधीच चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्याला अरिजीत सिंग, प्रितम आणि अमिताभ यांनी आवाज दिला होता. गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळाली.
आता हा बहुप्रतीक्षित ट्रेलर चाहत्यांची मने जिंकण्यास यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान चित्रपटात आलिया भट्ट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. निश्चितच या स्टारकास्टच्या चाहत्यांचा फायदा चित्रपटाला होणार आहे.