मुंबई - आलिया आणि वरूण ही जोडी आता चौथ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. स्टूडंट ऑफ द ईअर, बद्रीनाथ की दुल्हनिया आणि हंम्टी शर्मा की दुल्हनिया यापाठोपाठ आता कलंक चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरूण आणि आलिया नुकतंच पंजाबच्या जालंधरला रवाना झाले. जालंधरमधील एलपीयू विद्यापीठात १५ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन केले. यासोबतच दोघांनीही बाकी सब फर्स्ट क्लास हैं गाण्यावर ठेकाही धरला.
याशिवाय पंजाबी वेशभूषा करून पंजाबी गाण्यवरही दोघांनी ठेका धरला. दरम्यान १७ एप्रिलला 'कलंक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात आलिया आणि वरूणशिवाय माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.