महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कबीर सिंग'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ, पाहा आकडे - shahid kapoor

'कबीर सिंग' चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ कोटींची कमाई केली आहे. यानंतर आता दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली आहे

'कबीर सिंग'च्या कमाईत वाढ

By

Published : Jun 23, 2019, 4:04 PM IST

मुंबई- संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'कबीर सिंग' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने २०.२१ कोटींची कमाई केली आहे. यानंतर आता दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली असून शनिवारी या चित्रपटाने २२.७१ कोटींची कमाई केली आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने ४२.९२ कोटींची आकडा गाठला आहे. शनिवारी असलेल्या भारत अफगाणिस्तानच्या मॅचचा फारसा फटका या चित्रपटाच्या कलेक्शनला बसलेला दिसत नाही.

चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई ७० कोटींपर्यंत पोहोचेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. दरम्यान पहिल्या दिवशीच इतकी कमाई करणारा हा शाहिद कपूरच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट ठरला आहे. 'कबीर सिंग' चित्रपट दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details