मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार विद्युत जामवालचा 'जंगली' चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. लहान मुलांना या चित्रपटाची विशेष उत्सुकता होती. अशात आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली की नाही ? याचा अंदाज तुम्ही चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईवरून लावू शकता.
विद्युतच्या 'जंगली'ने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई - collection
'जंगली' चित्रपट हा अॅक्शन आणि नितांतसुंदर हिरव्यागार निसर्गाच्या फ्रेम्सने परिपूर्ण असा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हॉलिवूड दिग्दर्शक चक रसेल यांनी केले आहे.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३.३५ कोटींची कमाई केली आहे. विद्युत जामवालचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांना या चित्रपटाकडून अधिक अपेक्षा होत्या. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यात हा चित्रपट काही प्रमाणात अपयशी ठरला आहे, असे ही कमाई पाहता म्हणता येईल.
'जंगली' चित्रपट हा अॅक्शन आणि नितांतसुंदर हिरव्यागार निसर्गाच्या फ्रेम्सने परिपूर्ण असा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हॉलिवूड दिग्दर्शक चक रसेल यांनी केले आहे. शनिवार रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला झाला तर कदाचित या कलेक्शनमध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते.