मुंबई - काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले होते. यावेळी सलमानला ५ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा माफ व्हावी यासाठी सलमानने जोधपूर न्यायालयात निवेदन केले आहे. आजही या प्रकरणी असलेल्या सुनावणीसाठी सलमान न्यायालयात हजर न राहिल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
न्यायाधीश म्हणाले, पुढील तारखेला सलमान हजर राहिला नाही, तर त्याचा जामीन अर्ज फेटाळला जाईल. कारण, मागील सुनावणीवेळीही सलमानच्या वकिलांना त्याला न्यायालयात हजर करण्यास सांगितले गेले होते. त्यामुळे, याप्रकरणी न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त जामीन फेटाळण्याचा इशारा दिला आहे.