मुंबई - कबीर सिंग ( Kabir Sing) आणि जर्सी ( Jersey)या दोन तेलुगू रिमेक चित्रपटांमध्ये काम करणारा बॉलीवूड स्टार शाहीद कपूर (Shahid Kapoor) मंगळवारी म्हणाला की त्याला वडील पंकज कपूरसोबत (Pankaj Kapoor) स्क्रिन स्पेस शेअर करताना अजूनही भीती वाटते.
जर्सीसाठी आपल्या वडिलांसोबत पुन्हा एकत्र येत असलेल्या शाहिदने सांगितले की, जेव्हा एखाद्याचे वडीलदेखील त्याचा प्रोफेशनमध्ये असतात तेव्हा त्यांच्यासोबत काम करणे भीतीदायक असते. करंतर या पिता-पुत्र जोडीने यापूर्वी मौसम (Mausam )(2011) आणि शानदार (Shandar)(2015) मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.
"त्याच्यासोबत काम करताना अजूनही तणाव जाणवतो पण त्यांच्यासोबत काम करणे देखील आनंददायक आहे. मला त्यांच्या दरारा वाटतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप आदर असेल तेव्हा तुम्ही सक्षम बनण्याचा प्रयत्न करता, " असे जर्सी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी बोलताना शाहिद म्हणाला.
शाहिद कपूरने 2019मध्ये कबीर सिंग या चित्रपटात काम केले होते. तेलुगुमध्ये बनलेल्या अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होते. मूळ चित्रपटात ही मध्यवर्ती भूमिका विजय देवराकोंडाने (Vijay Devarakonda) साकारली होती. आता तो जर्सी या चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहे. अभिनेता नानी (Actor Nani) याने तेलुगु जर्सीमध्ये साकारलेली क्रिकेटपटूची भूमिका शाहिद हिंदीमध्ये करीत आहे.
जर्सी एका प्रतिभावान परंतु अयशस्वी क्रिकेटपटूची कहाणी आहे, जो भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन वयाच्या तिशीनंतरच्या उत्तरार्धात मैदानावर परतण्याचा निर्णय घेतो आणि भेट म्हणून त्याच्या मुलाची जर्सी परिधान करण्याची इच्छा पूर्ण करतो.