मुंबई- आजकाल इंटरनेटवर कुण्या व्यक्तीचे नव्हे, तर जेसीबीचे नाव चर्चेत आहे. फेसबुक असो अथवा ट्विटर, सगळीकडेच जेसीबीचेच मीम्स पाहायला मिळत आहेत. नेटकरीच नव्हे तर अभिनेत्री सनी लिओनीनेही आता यावर एक मीम्स शेअर केलं आहे. ज्यात ती जेसीबी मशीनवर उभी आहे. करिअर चेंज, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. मात्र, जेसीबीला एवढं ट्रोल करण्याची सुरूवात नेमकी झाली तरी कशी?
अशी झाली जेसीबीला ट्रोल करायची सुरूवात -
जर तुम्ही नियमित सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला या जोकविषयी आधीपासूनच कल्पना असेल. मात्र, ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांच्यासाठी ही माहिती नवीन असू शकते. भारतात जेव्हा एखादी जेसीबी मशीन खोदकाम करत असते तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी होते. हे लोक खोदकाम पाहण्यात आपला वेळ व्यर्थ घालवत असतात. यावरच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोक्स व्हायरल होत होते, मात्र काही कारणांमुळे ते जास्त चर्चेत आले नाहीत. परंतु, लोकसभा निवडणूका संपताच सोशल मीडियावरून राजकारणावरील चर्चा कमी झाल्या आणि जेसीबीची एन्ट्री झाली.
नेटकऱ्यांपासून सनीपर्यंत सर्वांनाच लागले जेसीबीचे वेध जेसीबीला ट्रोल करणाऱ्यांची संख्या सध्या एखाद्या सेलिब्रीटीला ट्रोल करणाऱ्यांहून अधिक आहे. आग लगा दो इस मोहब्बत की जुदाई को, पबजी छोड के देखो, तुम जेसीबी की खुदाई को, अशा प्रकारचे अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे तुम्हालाही हसायला भाग पाडतील.
नेटकऱ्यांपासून सनीपर्यंत सर्वांनाच लागले जेसीबीचे वेध नेटकऱ्यांपासून सनीपर्यंत सर्वांनाच लागले जेसीबीचे वेध नेटकऱ्यांपासून सनीपर्यंत सर्वांनाच लागले जेसीबीचे वेध