मुंबई- अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांचा आज ५७ वा वाढदिवस. सिनेसृष्टीतून आपल्या करिअरला सुरूवात करणाऱ्या जयाप्रदा आज राजकारणातील एक सक्रीय नाव आहे. त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. मात्र, या सर्वातून सावरून आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.
B'day Spcl: जया प्रदांचा चित्रपटसृष्टीपासून राजकारणापर्यंतचा प्रवास - Loksabha
आता त्या भाजपात सामील झाल्या असून उत्तर प्रदेशातील रामपूरमधून त्या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
चित्रपटसृष्टीतील करिअर - जया प्रदांनी 'भूमिकोसम' या तेलुगू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना केवळ १० रूपये मानधन मिळाले होते. दाक्षिणात्य सिनेमांशिवाय शराबी, माँ, सरगम, तोहफा आणि संजोगसारख्या अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. ८० च्या दशकात जयाप्रदा एक आघाडीची अभिनेत्री होत्या.
राजकारणात प्रवेश - १९९४ मध्ये जया प्रदांनी तेलुगू देसम पार्टीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत जयाप्रदा रामपूरमधून निवडून आल्या. मार्च २०१४ मध्ये जयाप्रदा यांनी राष्ट्रीय लोकदलामध्ये प्रवेश केला तर आता त्या भाजपात सामील झाल्या असून उत्तर प्रदेशातील रामपूरमधून त्या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.