मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. यातील बहुतेकांना प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळालं. यानंतर आता अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया बेदीदेखील बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाली आहे.
सैफसोबत बॉलिवूड पदार्पणासाठी 'ही' स्टारकिड सज्ज; चित्रीकरणाला सुरूवात - Jawaani Jaaneman
'जवानी जानेमन' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता सिनेमाच्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरूवात झाली आहे.
बॉलिवूड नवाब सैफ अली खानसोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार असून 'जवानी जानेमन' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता सिनेमाच्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरूवात झाली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सेटवरील एक फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या चित्रपटात सैफ अलायाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. नितिन कक्कड या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.