मुंबई- 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱया जान्हवी कपूरला पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर जान्हवीनं अनेक नवे सिनेमे साईन केले. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या रूही अफ्झा आणि कारगिल गर्लसारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
जान्हवीनं पूर्ण केलं जॉर्जियामधील 'कारगिल गर्ल'चं चित्रीकरण, पाहा फोटो - अंगद बेदी
नुकतंच जान्हवीनं आपल्या कारगिल गर्ल चित्रपटाचं जॉर्जियामधील शेड्यूल पूर्ण केलं आहे.हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार असून या चित्रपटात जान्हवी गुंजन सक्सेनाची भूमिका करताना दिसणार आहे.
नुकतंच जान्हवीनं आपल्या कारगिल गर्ल चित्रपटाचं जॉर्जियामधील शेड्यूल पूर्ण केलं आहे. चित्रपटाच्या सेटवरील तिचा फोटो समोर आला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार असून या चित्रपटात जान्हवी गुंजन सक्सेनाची भूमिका करताना दिसणार आहे.
या चित्रपटात अंगद बेदी गुंजनच्या भावाची भूमिका करताना दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.