महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Money laundering case : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनची चौकशी, नेमकं प्रकरण काय आहे? - Jacqueline Fernandez

अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीचने मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली. ही चौकशी दिल्लीत झाली. हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर या व्यक्तिशी संबंधित आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Money laundering case
जॅकलीन

By

Published : Oct 21, 2021, 7:26 AM IST

नवी दिल्ली - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहे. गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने तीची बुधवारी चौकशी केली आहे. या पूर्वी 16 ऑक्टोबरलादेखील जॅकलिन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, जॅकलिन हजर राहू शकली नाही. त्यानंतर तीला 18 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हाही ती हजर झाली नव्हती. त्यानंतर आता बुधवारी ती दिल्लीतील सक्तवसूली संचालनालयाच्या कार्यालयात पोहचली. दोन्हीवेळेस सूत्रांच्या माहितीनुसार जॅकलिनने खासगी कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर याची मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीसचे नाव समोर आल्याची चर्चा आहे. सुकेश चंद्रशेखर हा तिहार कारागृहात असून सुकेशवर दोनशे कोटी रुपयांच्या वसुली व खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आरोप आहे.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

‘तिहार कारागृहातून 200 कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची तिला कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलिन म्हणाली होती.

जॅकलीन भूत पुलिस सिनेमामुळे चर्चेत

सध्या, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही आगामी भूत पुलिस सिनेमामुळे चर्चेत आहे. भूत पुलिसमध्ये अभिनेता सैफ अली खान आणि अर्जून कपूर हे प्रमुख भूमिकेत आहेत. मूळची श्रीलंकेची जॅकलिन बॉलिवूड अभिनेता सलमान खानची जवळची व्यक्ती मानली जाते. जॅकलिनचे वडील श्रीलंकेचे रहिवासी आहेत. तर आई मलेशियाची आहे. जॅकलिनचे वडील संगीतकार आहेत आणि आई एअर होस्टेस होती. जॅकलीन 4 भावंडांमध्ये सगळ्यात लहान आहे. जॅकलिनला एक मोठी बहीण आणि 2 मोठे भाऊ आहेत.

हेही वाचा -बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून सलग पाच तास चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details