मुंबई - बॉलिवूड स्टार जॅकलिन फर्नांडिजने गुरुवारी मुंबईत गरजूंना अन्नदान करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला भेट दिली. त्या ठिकाणी आलेल्या गरजवंतांना अन्न वाढण्यासाठी तिने मदतही केली.
जॅकलिनने 'यू ओन्ली लाईव्ह वन्स' (योलो) हे फाऊंडेशन सुरू केले आहे. या अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन देण्याचे काम योलो मार्फत केले जाते. जॅकलिनने असेच समाजपयोगी काम करणाऱ्या रोटी बँक या संस्थेला भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, "मदर टेरेसा एकदा म्हणाल्या होत्या की, 'जेव्हा भुकेल्यांना अन्न दिले जाते तेव्हा शांती सुरू होते.' मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांच्यामार्फत चालवल्या जाणार्या, रोटी बँकला भेट दिल्यानंतर भारावून गेले. रोटी बँकच्या वतीने आजपर्यंत लक्षावधी भुकेल्या लोकांना अन्न पुरवण्यात आले आहे.''