मुंबई : कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शूटिंग करणे किंवा जवळच्या इंटिरियरमध्ये डबिंग करण्यास पुन्हा सुरू करणे धोकादायक असल्याचे चित्रपटाचे निर्माते शेखर कपूर यांनी म्हटलं आहे.
आपल्याला कोरोना व्हायरसची बाधा झाली असल्याचे उघडपणे सांगणाऱ्या कलाकारांचे शेखर कपूर यांनी कौतुक केले आहे. त्यासोबतच त्यांनी नजिकच्या काळात बंद जागेत कामाला सुरुवात करणे धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.
"आपले लाडके कलाकार लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करुयात. त्यांनी आपल्याला कोरोना झालाय हे उघड सांगितल्याबद्दल त्यांचे कौतुकही करुयात. कित्येकजण हे जगाला सांगत नाहीत. यातून हे सिद्ध होतंय की शूटिंग किंवा डबिंग बंद जागेत सुरू करणे किती धोक्याचे आहे. स्टुडिओ केवळ संसर्गाचे प्रचंड स्रोत बनतील," असं शेखर कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.