मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यनची भूमिका असलेल्या 'धमाका' चित्रपटाच्या टीमने १४ डिसेंबर रोजी पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुटिंगला सुरूवात केली होती. कार्तिकने आपले शुटिंग १० दिवसातच पूर्ण केले असून कोरोनामुळे चिंतीत असलेल्या आपल्या आईच्या भेटीसाठी घरी परत येणार आहे.
एका आघाडीच्या वेबलॉईडने दिलेल्या अहवालानुसार अभिनेता कार्तिकने आपला आगामी 'धमाका' चित्रपट दहा दिवसात संपवला असून एक नवीन उदाहरण घालूनदिले आहे. ३०० लोकांचे युनिट हॉटेलमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करीत हॉटेलमध्ये सुरक्षित शूटिंग करीत होते.
रोमँटिक कॉमेडीजसाठी ओळखला जाणारा कार्तिक धमाका चित्रपटात एक पत्रकार म्हणून काम करताना दिसणार आहे. 'धमाका' चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि माधवानी यांच्यासह सह-निर्माता अमिता माधवानी यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट सेट करण्यात आला आहे.