महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ITA 2022: रणवीर सिंग, राखी सावंतच्या मॅड एनर्जीने रेड कार्पेटवर वादळ - राखी सावंतच्या मॅड एनर्जीने रेड कार्पेटवर वादळ

रणवीर सिंग आणि राखी सावंतने ITA अवॉर्ड्स 2022 मध्ये आपल्या अफाट एनर्जीने मने जिंकली. राखी आणि रणवीरने रविवारी रात्री मुंबईत झालेल्या अवॉर्ड गालाच्या रेड कार्पेटवर त्यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातील रणवीरच्या 'तताड तताड' गाण्यावर हुकस्टेप देखील केले.

रणवीर सिंग, राखी सावंत
रणवीर सिंग, राखी सावंत

By

Published : Mar 7, 2022, 1:23 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अफाट एनर्जीने कोणताही प्रसंग अलौकिक बनवण्यासाठी ओळखला जातो. एका अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवर राखी सावंतनेही रणवीरसोबत आपल्या एनर्जीचे प्रदर्शन केले. सोशल मीडियावर राखी आणि रणवीरचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यावर युजर्स भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

रविवारी रात्री 21 व्या इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सोहळ्यात चित्रपट आणि टेलिव्हिजन तारे तारका अवतरल्या होत्या. मुंबईत आयटीए 2022 अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर रणवीर आणि राखीची भेट झाली तेव्हा दोघेही उत्साहात दिसले. राखी आणि रणवीरने त्यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातील रणवीरची 'तताड तताड' ही हुकस्टेप देखील केली.

रेड कार्पेटवर थोडक्यात गप्पा मारत राखी आणि रणवीरने हौशी फोटोग्राफर्सना भरपूर पोझ देत मजा मस्ती केली. दोघांनीही ITA 2022 मध्ये प्रसारमाध्यमांना खूश करुन सोडले.

इंडियन टेलीव्हिजन अकॅडमीच्या वतीने भारतीय टीव्ही कलाकारांसाठी वार्षिक आयटीए पुरस्कारांचे आयोजन केले जाते. २०२२ चा आयटीए पुरस्कार हा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रणवीरला चित्रपट श्रेणीतील लोकप्रिय अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला वाणी कपूर, आलिया भट्ट करण जोहर, हिना खान, रश्मी देसाई आणि इतर अनेकजण उपस्थित होते.

हेही वाचा -ह्रतिकने सबा आझादला म्हटले 'विलक्षण व्यक्ती', वाचा तिची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details