मुंबई- भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित 'मिशन मंगल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळ मोहिमेच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या व्यक्तींची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असून काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरवर आता इस्त्रोची प्रतिक्रिया आली आहे.
'मिशन मंगल'च्या ट्रेलरवर इस्त्रोची प्रतिक्रिया; भावना आणि छंदाची झलक - sonaskhi sinha
'मिशन मंगल'च्या ट्रेलरमधून इस्त्रोच्या टीमचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं दाखवलं गेलं आहे. यात टीमच्या भावनांची आणि छंदाची झलकही पाहायला मिळते, असं ट्विट इस्त्रोच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.
'मिशन मंगल'च्या ट्रेलरमधून इस्त्रोच्या टीमचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं दाखवलं गेलं आहे. यात टीमच्या भावनांची आणि छंदाची झलकही पाहायला मिळते, असं ट्विट इस्त्रोच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. तर या ट्विटनंतर अक्षयनंही इस्त्रोचे आभार मानले आहेत.
मिशन साध्य! आम्हाला एक प्रेरित करणारी कथा जगासमोर मांडण्याची संधी देण्यासाठी धन्यवाद. ही संधी आम्हाला मिळणं हा खरंच आमचा सन्मान आहे. हे माझ्या मिशन मंगलच्या संपूर्ण टीमच्यावतीने मी बोलत आहे, असं अक्षयनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.