महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अक्षय कुमार इतका कार्तिक चांगला आहे? 'भुल भुलैय्या २' च्या दिग्दर्शकाने दिले सडेतोड उत्तर

अक्षय कुमारच्या 'भूल भुलैय्या'च्या सिक्वेलसाठी कार्तिक आर्यनने साईन केल्यानंतर त्याची तुलना अक्षय कुमारसोबत होत आहे. कारण लोकांना असे वाटत होते की अक्षयने साकारलेल्या भूमिकेला न्याय मिळू शकणार नाही. अलिकडे, भूल भुलैया 2 चे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनाही कार्तिकच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे.

Kartik Aaryan as good as Akshay Kuma
अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनची तुलना

By

Published : Mar 31, 2021, 8:01 PM IST

मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यनची अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारशी तुलना केली जात आहे. २००७ मध्ये रिलीज झालेल्या अक्षयच्या 'भूल भुलैय्या'च्या सिक्वेलसाठी त्याने साईन केल्यानंतर ही तुलना होत आहे. अलिकडे, भूल भुलैया 2 चे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनाही कार्तिकच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे.

'भूल भुलैया 2' ची घोषणा 2019 मध्ये झाली होती आणि कार्तिक आणि कियारा अडवाणी या चित्रपटात काम करणार असल्याचे समजताच नेटीझन्सनी सोशल मीडियावर वादळ निर्माण केले होते. कारण लोकांना असे वाटत होते की अक्षय आणि विद्या बालनने साकारलेल्या भूमिकेला न्याय मिळू शकणार नाही. तर काहींना हा सिक्वेलच बनू नये असे वाटत होते.

तुलना आणि टीका आजही सुरू आहे. एका वेबलोईडसोबत झालेल्या चिटचॅटमध्ये अनीझ यांना विचारले गेले की पहिल्या भूला भुलैय्या चित्रपटातील अक्षय कुमार इतका कार्तिक चांगला आहे का? त्यावर अनीसने उत्तर दिले की, "मला अक्षयने केलेल्या भुल भुलैय्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मला माहिती नाही."

तुलनेच्या प्रश्नाला बाजूला सारत अनिसने उत्तर दिले की, ''त्याच्यासोबत काम करण्यास आनंद वाटतोय. कार्तिक नेहमी वेळेवर हजर राहतो. तो व्यावसायिक आहे. तो कामात कोणतीही छेडछाड करीत नाही. कार्तिक सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. तो शुटिंगच्या सेटवर असताना आनंदाच्या लहरी उमटतात. आम्हाला आत्ता सकारात्मकतेची गरज आहे.''

प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूल भुलैया' हा १९९३ मध्ये आलेल्या मणिकिरथझहू या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक होता. या चित्रपटात अमिषा पटेल, परेश रावल, मनोज जोशी, असराणी, राजपाल यादव आणि विक्रम गोखले यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील विद्या बालनची भूमिका आजवरची श्रेष्ठ मानली जाते.

हेही वाचा - 'वेल डन बेबी’: पाहा, पुष्कार जोग आणि अमृता खानवीलकरची संवेदनशील मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details