महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 30, 2021, 7:28 PM IST

ETV Bharat / sitara

बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत सरकारच्या बाजूने बोलण्याची एकही संधी सोडत नाही. मोदी सरकार विरोधी गटांवर ती नेहमी हल्ला चढवत असते. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सरकारवर टीका होत असताना कंगनाने व्हिडिओ शेअर करुन आपली मते मांडली आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मोदी सरकारवर टीका होत आहे. हे टीका करणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिने म्हटलंय. भारत सरकारला या उपद्रवींचा बंदोबस्त करण्यासाठी काही ना काहीतरी इलाज शोधावा लागेल, ज्यामुळे हे लोक देशाला बदनाम करणार नाहीत, असेही ती म्हणाली आहे.

कंगना आपल्या व्हिडिओत म्हणते, ''भारतावर जेव्हाही एखाद संकट येतं तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोहीम सुरू होते. सगळे देश एक होतात आणि असं दाखवायचा प्रयत्न करतात की तुम्ही आता कुठं माकडाचे माणूस झाला आहेत. तुम्हाला काहीच कळत नाही. त्यामुळे आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही ऐका. काय केले पाहिजे, नाही केले पाहिजे, लोकशाही काय असते याबद्दल तुम्हाला अक्कलच नाही. यासर्वांचं चॅनेल असते हे बुध्दीजीवी लोक.''

बुध्दीजीवींवर टीका करताना कंगना पुढे म्हणाली, ''टाईमच्या मॅगझिनवर प्रेतांचे फोटो येतात, ही प्रेतं सर्वाधिक खप असणारी आहेत. तिकडे बरखा दत्त जाते आणि रडते की इथे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही. राणा आयुब, अरंधती रॉय हे लोक यांचे सोर्स बनतात. भारताची आंतरराष्ट्रीय इमेज खराब करतात. आपली इकॉनॉमी, आपली फॉरेन इन्व्हेस्टमेंट हे येत्या काळात आव्हान असणार आहे. वुहानमध्ये जन्मलेल्या या व्हायरसला कम्युनिस्ट व्हायरस म्हणण्याची यांची औकात नाही. हे लोक आम्हाला सांगतात की आम्ही देश कसा चालवायला हवा. कोण आहेत हे? अमेरिकेत, इटलीत काय झाले हे आपण पाहिले, इंग्लंडही दुसरी लाट सोसतोय आपणही झगडतोय, पण तिथे कोण्या नेत्यावर आरोप झाले?त्यांच्या लोकशाहीवर टीका झाली? भारत सरकारला या उपद्रवींचा बंदोबस्त करण्यासाठी काही ना काहीतरी इलाज शोधावा लागेल. ज्यामुळे हे लोक देशाला बदनाम करणार नाहीत. जय हिंद.''

हेही वाचा - ‘इंडिया इस ब्लीडींग’; कोविड निधी उभारण्यासाठी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा करतेय प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details