मुंबई- बॉलिवूडमधील सध्या चांगलीच चर्चेत असणारी जोडी म्हणजेच कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. कार्तिकला डेट करण्याची इच्छा साराने एका शोमध्ये व्यक्त केल्यानंतर हे कपल चांगलंच चर्चेत आलं. अशात आता ही जोडी लवकरच ऑनस्क्रीनही एकत्र झळकणार आहे.
कार्तिक-सारानं पूर्ण केलं आगामी चित्रपटाचं हिमाचल प्रदेशातील चित्रीकरण, पाहा फोटो
सारा आणि कार्तिकने आपल्या आगामी चित्रपटाचं हिमाचल प्रदेशमधील शेड्यूल पूर्ण केलं आहे. हा चित्रपट हिमाचल प्रदेशसह दिल्ली, उदयपूर आणि मुंबईमध्येही चित्रीत होत आहे.
इम्तियाज अली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालं नाही. मात्र, हा चित्रपट लव आज कल या चित्रपटाचा सिक्वल असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, नुकतंच सारा आणि कार्तिकने आपल्या या चित्रपटाचं हिमाचल प्रदेशमधील शेड्यूल पूर्ण केलं आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. हा चित्रपट हिमाचल प्रदेशसह दिल्ली, उदयपूर आणि मुंबईमध्येही चित्रीत होत आहे. या चित्रपटात सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि रणदीप हुड्डा यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. २०२० मध्ये १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.