मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेच असते. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात उडी घेतल्यानंतर सातत्याने तिने मोठी विधाने केली आहेत. मुंबईला पाकव्यापत काश्मीर म्हटल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र तयार झाले आहे. यातच तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो, असे तिने कबूल केल्याचे पाहायला मिळते.
'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल - ड्रग्स
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात उडी घेतल्यानंतर कंगनाने मोठी विधाने केली आहेत. यातच तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो, असे तिने कबूल केल्याचे पाहायला मिळते.
मार्चमध्ये कंगनाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. '16 वर्षांची असताना मी घर सोडलं. त्यानंतर मुंबईत येऊन चित्रपट क्षेत्रात काम केलं. त्यानंतर काही काळातच मी ड्रग्जच्या आहारी गेले होते. मी आशा कठिण परिस्थितीमध्ये होते, जेथून फक्त मृत्यूच बाहेर पडण्याचा मार्ग होता. मात्र, आज मी खूश आहे,' असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग-लिंक्स समोर आल्या आहेत. बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंगनाने सिनेसृष्टीतील काही लोकांची चाचणी करण्याची मागणी केली होती. रणबीर कपूर, रणवीस सिंह, अयान मुखर्जी यांची ड्रग्ज टेस्ट करा, असे तिने म्हटले होते.