मुंबई- प्रभासचे चाहते सुजित यांचं दिग्दर्शन असलेल्या बिग बजेट 'साहो' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. २०१७ मध्ये आलेल्या 'बाहुबली २' चित्रपटानंतर आता तब्बल २ वर्षांनी त्याच्या चाहत्यांना त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र, 'साहो' चित्रपटासाठी आपल्याला आयुष्यातील दोन वर्ष घालवण्याची इच्छा नसल्याचा खुलासा प्रभासनं 'साहो'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान केला.
'साहो'साठी दोन वर्ष घालवायची नव्हती, मात्र या गोष्टीमुळे बदलला निर्णय - प्रभास - पैसे
अॅक्शन चित्रपटांसाठी तुम्हाला खूप तयारी करण्याची गरज असते. अबू धाबीसारख्या ठिकाणी शूट केलेल्या सीनसाठी आम्हाला जवळजवळ एक वर्ष लागलं, असं प्रभास म्हणाला.
या सिनेमासाठी मला २ वर्ष देण्याची इच्छा नव्हती, कारण याआधीही मी 'बाहुबली' चित्रपटासाठी माझी ४ वर्ष दिली होती. परंतु, अॅक्शन चित्रपटांसाठी तुम्हाला खूप तयारी करण्याची गरज असते. अबू धाबीसारख्या ठिकाणी शूट केलेल्या सीनसाठी आम्हाला जवळजवळ एक वर्ष लागलं, असं तो म्हणाला.
या चित्रपटासाठी खूप तयारीची गरज होती आणि मला दिग्दर्शक आणि निर्माते यांना सहकार्य करायचं होतं. कारण त्यांनी यावर खूप पैसे खर्च केले होते, असंही प्रभास पुढे म्हणाला. दरम्यान हा सिनेमा येत्या ३० ऑगस्टला हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.