महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जुनून ए इश्क में हर रंग लाल होता हैं'! प्रेमाची हिंसक जिद्द, 'हमे तुमसे प्यार कितना'चा ट्रेलर प्रदर्शित - dialouge

. 'जुनून ए इश्क में हर रंग लाल होता हैं! कोई दरमियान भी आ जाए तो खून भी गुलाल होता हैं, यासारखे डायलॉग या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात.

'हमे तुमसे प्यार कितना'चा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jun 3, 2019, 11:41 PM IST

मुंबई- निरागस आणि निस्वार्थी प्रेमाची व्याख्या बदलणारा 'हमे तुमसे प्यार कितना' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील इतर प्रेमकथांना आणि त्यातील प्रेमाच्या संकल्पनेला छेद देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री प्रिया बॅनर्जी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'जुनून ए इश्क में हर रंग लाल होता हैं! कोई दरमियान भी आ जाए तो खून भी गुलाल होता हैं, यासारखे डायलॉग या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात.

'हमे तुमसे प्यार कितना'चा ट्रेलर प्रदर्शित

समोरच्याला आपलं बनवण्याची करणवीरची हिंसक जिद्द या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तर बॅकग्राऊंडला हमे तुमसे प्यार कितना हे गाणं ऐकायला मिळतं. या चित्रपटात करण आणि प्रियाशिवाय समीर कोच्चर आणि महेश बलराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर ट्रेलरमध्ये जूही चावलाचीही काही सेकंदाची झलक पाहायला मिळते. येत्या २८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details