महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हूड हूड दबंग..! भाईजाननं केलं 'दबंग ३'मधील पहिल्या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण - salman khan

'दबंग ३' मधील 'हूड हूड दबंग'चं चित्रीकरण पूर्ण असं कॅप्शन देत सलमानने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे

दबंग ३च्या पहिल्या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण

By

Published : Apr 7, 2019, 10:11 AM IST

मुंबई- 'दबंग' आणि 'दबंग २'ला मिळालेल्या धमाकेदार यशानंतर चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दबंग ३' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मध्यप्रदेशातील महेश्वरमध्ये सुरूवात झाली असून चित्रपटातील पहिल्या गाण्याचे चित्रीकरणही पूर्ण झाले आहे.

'दबंग ३' मधील 'हूड हूड दबंग'चं चित्रीकरण पूर्ण असं कॅप्शन देत सलमानने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. फोटोत सलमानचा नेहमीप्रमाणे असणारा जबरदस्त दबंग लूक पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागांप्रमाणे यातही सोनाक्षी सिन्हा सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सोनाक्षी, सलमान आणि अरबाज खान काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशला रवाना झाले आहेत. प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून वॉन्टेडनंतर तब्बल १० वर्षांने सलमान आणि प्रभूदेवाची जोडी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकत्र झळकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details