मुंबई- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या सुपर ३० चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातील हृतिकच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक होत आहे. तर हृतिक मात्र मिसेस फडणवीसांचं कौतुक करण्यात व्यग्र आहे.
हृतिकनं घेतली अमृता फडणवीसांची भेट, फोटो केला शेअर - vivek oberoi
हृतिकनं नुकतीच अमृता फडणवीस आणि विवेक ओबेरॉय यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो हृतिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
हृतिकनं नुकतीच अमृता फडणवीस आणि विवेक ओबेरॉय यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो हृतिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने अमृता यांच्या कामाचंही कौतुक केलं आहे.
दरम्यान हृतिकच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुपर ३० चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने ४ दिवसात अर्धशतक करत ५० कोटींचा गल्ला पार केला आहे. यानंतर हृतिक लवकरच वॉर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात तो टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.