महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिक म्हणतो, माझ्यासोबत काम करण्याची क्षमता फक्त याच अभिनेत्यात - upcoming film

सिद्धार्थ आनंदचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने टायगर आणि हृतिक पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे, त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हृतिक रोशन

By

Published : Jul 5, 2019, 2:00 PM IST

मुंबई- बॉलिवूडमधून २ वर्ष ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन लवकरच सुपर ३० चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपर ३० चित्रपटातून तो बायोपिकमध्ये पाऊल टाकत असून यानंतर तो एका अॅक्शन ड्रामा चित्रपटात टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सिद्धार्थ आनंदचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने टायगर आणि हृतिक पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे, त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात टायगरसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत आपलं मत हृतिकनं एका माध्यमाशी बोलताना मांडले आहे.

माझ्या मते, टायगर एकमेव असा कलाकार आहे, ज्याच्यामध्ये माझ्यासमोर उभा राहण्याची क्षमता आहे. त्याने ज्याप्रमाणे मला स्फूर्ती दिली, ती अन्य कोणी देऊ शकेल असे मला वाटत नाही, असे म्हणत हृतिकने टायगरच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details