मुंबई- काही दिवसांपूर्वीच 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यासोबतच चित्रपटाच्या स्टारकास्टवरूनही पडदा उठवण्यात आला होता. अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात आज या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे.
'हाऊसफुल्ल ४'मधील गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात; अशी आहे तगडी स्टारकास्ट - song
'हाऊसफुल्ल ४'मधील एका गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. या गाण्यात चित्रपटाची संपूर्ण टीम आणि नवाजुद्दीन सिद्दीकी झळकणार आहे.
'हाऊसफुल्ल ४'मधील गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. या गाण्यात चित्रपटाची संपूर्ण टीम आणि नवाजुद्दीन सिद्दीकी झळकणार असल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.
दरम्यान फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर साजिद नादियाडवाला यांची निर्मिती असणार आहे. १८० कोटींचं बजेट असणारा हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.