मुंबई- अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी 'गेम ओव्हर' चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली. 'गेम ओव्हर' हा चित्रपट एका तेलुगू-तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. तर तापसीच्या या चित्रपटाचा पहिला टीझर १५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तापसीच्या 'गेम ओव्हर'चा टीझर 'या' दिवशी होणार प्रदर्शित - taapsee pannu
गेम ओव्हर' हा चित्रपट एका तेलुगू-तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.अनुराग कश्यप हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित झाली नाही. अश्विन सारावनन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
तर अनुराग कश्यप हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तापसीनं याआधीही मनमर्जिया चित्रपटासाठी अनुरागसोबत काम केलं आहे. या चित्रपटाशिवाय तापसी 'सांड की आँख' आणि 'मिशन मंगल' चित्रपटातूनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.