महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दीपिका आणि प्रभास 'के' चित्रपटाच्या शुटिंगसाठी सज्ज - दीपिका पदुकोण के

दीपिका पदुकोण आणि प्रभास त्यांच्या आगामी चित्रपट 'के'चे दुसरे शेड्यूल सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित आगामी चित्रपट एक साय-फाय ड्रामा आहे. यामध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची टीम हैदराबादमध्ये दुस-या शेड्यूलची सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दीपिका आणि प्रभास
दीपिका आणि प्रभास

By

Published : Feb 8, 2022, 11:47 AM IST

हैदराबाद (तेलंगणा)- बाहुबली या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेता प्रभासकडे भव्य आणि नेत्रदीपक चित्रपटांची मोठी यादी आहे. त्याचा आगामी 'के' हा चित्रपटही भव्य असेल. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली होती. आता या चित्रपटाचे दुसरे शेड्यूल हैदराबादमध्ये पार पडणार आहे.

बहुप्रतिक्षित असलेला 'के' हा चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. निर्मात्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे शुटिंग हैदराबादमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभास आणि दीपिका पदुकोण या शेड्यूलमध्ये भाग घेणार आहेत आणि हे एक लांबलचक शेड्यूल असेल.

या शेड्यूलमध्ये मुख्य जोडी असलेले काही महत्त्वपूर्ण सीक्‍वेन्स पूर्ण केले जातील अशी अपेक्षा आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या शुटिंग शेड्यूलशी संबंधित सूत्रांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

के या साय-फाय चित्रपटात दीपिका पदुकोण आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत आणि त्याची निर्मिती वैजयंती मुव्हीजने केली आहे. मेगा मूव्हीच्या पहिल्या शेड्यूलमध्ये दीपिका हैदराबादला गेली होती. वृत्तानुसार, दीपिका तिचा आगामी गेहराइयाँ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लवकरच हैदराबादला पोहोचेल. हा चित्रपट या शुक्रवारी Amazon प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -Urmila Matondkar Defends Srk : 'ईश्वर अल्लाह तेरे नाम...असे म्हणत उर्मिलाने शाहरुखच्या ट्रोलर्सना दिले उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details