महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फिटनेससाठी काहीही...! जीम बंद, प्रियांकाने स्वतःला फिट ठेवण्यासाठी शोधला पर्याय - फिटनेससाठी काहीही

प्रियांकाने शनिवारी इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केला. यात ती डंबेल्सच्या जागी एका लहान मुलीला उचलत आहे. नो जीम, नो प्रॉब्लम, असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. सध्या प्रियांका अमेरिकेत असून पती निक जॉनससोबत वेळ घालवत आहे.

प्रियांकाने स्वतःला फिट ठेवण्यासाठी शोधला पर्याय
प्रियांकाने स्वतःला फिट ठेवण्यासाठी शोधला पर्याय

By

Published : May 3, 2020, 1:32 PM IST

मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्वतःला फिट ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करताना दिसते. अनेकदा तिचे जिममधील फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे जीम बंद आहेत आणि घरातून बाहेर पडणंही शक्य नाही. त्यामुळे, स्वतःला फीट ठेवण्यासाठी प्रियांकाने घरीच व्यायामाला सुरुवात केली आहे.

प्रियांकाने शनिवारी इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केला. यात ती डंबेल्सच्या जागी एका लहान मुलीला उचलत आहे. नो जीम, नो प्रॉब्लम, असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. सध्या प्रियांका अमेरिकेत असून पती निक जॉनससोबत वेळ घालवत आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने आपला निळ्या साडीतील एक फोटो शेअर केला होता. या फोटोलाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती. तर, नुकतंच प्रियांकाने पंतप्रधान सहाय्यता निधी, गुंज, फिडींग अमोरिका आणि इतरही काही संस्थांना आर्थिक मदत दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details