मुंबई - बॉलिवूडची 'ड्रीमगर्ल' अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी योग्य ती काळजी आणि खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. रविवारी (२२ मार्च) देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडू नये, असे हेमा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आपले हात साबणाने धुवून स्वच्छ ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. घरी कुटुंबासोबत वेळ घालवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
हेही वाचा -कोरोना व्हायरसवर नंदेश उमप यांचा हा पोवाडा एकदा ऐकाच!