महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अरे हे काय.. ड्रीम गर्ल हेमामालिनी चक्क करत आहे शेतात काम, पाहा फोटो - election

कलाकार बहुतेक वेळा चाहत्यांपासून सुटकेसाठी पळ काढत असतात. मात्र, हेच कलाकार जेव्हा राजकारणात प्रवेश करतात, तेव्हा हे चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं

हेमा मालिनी पोहोचल्या शेतात

By

Published : Apr 1, 2019, 8:08 AM IST

मुंबई- बहुदा कलाकारांच्या एका झलकसाठीही चाहते जिवाच्या आकांताने अनेक प्रयत्न करत असतात. त्यांनी आपल्याला एकदा भेटावं आणि आपल्यासोबत फोटो काढावा, अशी आशा चाहत्यांना नेहमीच असते. दरम्यान कलाकार बहुतेक वेळा चाहत्यांपासून सुटकेसाठी पळ काढत असतात. मात्र, हेच कलाकार जेव्हा राजकारणात प्रवेश करतात, तेव्हा हे चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं. असंच काहीसं झालं हेमा मालिनींसोबत.

अनेकांसाठी ड्रीम गर्ल असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनींनी स्वतः शेतात जाऊन कामगारांची भेट घेतली आहे. इतकंच नाही तर त्यांना कामात मदतही केली आहे. याच कारण म्हणजे, हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. याच निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची एक आगळी वेगळी पद्धत त्यांनी निवडली आहे. ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मथुरेतील एका शेतात जाऊन तेथील कामगारांना गव्हाच्या पेंढ्या बांधण्यास त्या मदत करत आहेत. शेतात काम करतानाचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एखाद्या राजकारण्याने प्रचारासाठी कदाचितच कधी अशी पद्धत वापरली असेल. त्यामुळे त्यांच्या या प्रचार मोहिमेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मात्र, आता त्यांचे हे प्रयत्न फळाला येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details