नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात केंद्र सरकारपासून राज्य सरकार आणि कलाकारही नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. या यादीत आता हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीदेखील सामील झाली आहे.
लॉकडाऊनचे पालन करणाऱ्यांचे सपना चौधरीने मानले आभार, म्हणाली..
सपना चौधरीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, नागरिकांना घरात राहण्याची विनंती केली आहे. यात तिने म्हटलं आहे, की ती त्या लोकांना काहीच बोलणार नाही, जे सरकारच्या सूचनांचे पालन करत नाहीत. तर, जे लोक सरकारच्या सूचनांचे पालन करुन घरात थांबले आहेत अशांचे आभार मानते.
सपना चौधरीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, नागरिकांना घरात राहण्याची विनंती केली आहे. यात तिने म्हटलं आहे, की ती त्या लोकांना काहीच बोलणार नाही, जे सरकारच्या सूचनांचे पालन करत नाहीत. तर, जे लोक सरकारच्या सूचनांचे पालन करून घरात थांबले आहेत अशांचे आभार मानते.
पुढे ती म्हणाली, काही लोक कोणाचेही न ऐकता घराबाहेर पडत आहेत. मात्र, हे चुकीचे आहे. सध्या सर्वांना सोबत मिळून ही लढाई जिंकायची आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी घरातच राहणे गरजेचे आहे. तर, या महामारीवरील उपाययोजनांसाठी निधी न दिल्याचे प्रश्न करणाऱ्यांनाही तिने सडेतोड उत्तर दिले आहे. मी मदत केली तर सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करुन शो ऑफ करणार नसल्याचे तिने म्हटले आहे.