महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हर्षवर्धन कपूर आगामी रोमँटिक कॉमेडीमध्ये अलाया एफसोबत करणार रोमान्स? - अनिल कपूर यांचा मुलगा हर्ष वर्धन कपूर

हर्षवर्धन कपूर आणि अलाया एफ आगामी रोमँटिक कॉमेडीमध्ये रोमान्स करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2016 मध्ये रिलीज झालेल्या मिर्झिया चित्रपटातून अभिनेता हर्ष वर्धन कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर जवानी जानेमन या चित्रपटासाठी अलाया एफने अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू महिला प्रकारात फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.

harsh-varrdhan-kapoor-to-romance-alaya-f-in-next
हर्षवर्धन कपूर आणि अलाया एफ

By

Published : Jun 22, 2021, 10:33 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार अनिल कपूर यांचा मुलगा हर्ष वर्धन कपूर आणि अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया एफ आता आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती हर्षची बहिण रिया कपूर करणार आहे. यापूर्वी तिने आयेशा, खूबसुरत आणि वीरे दी वेडिंग या चित्रपटांची निर्मिती केली होती.

रिपोर्ट्सनुसार, रिया कपूर सध्या वीरे दी वेडिंगच्या सिक्वेलसह काही प्रोजेक्टवर काम करत आहे. हर्षवर्धनसोबतचा अलायाचा चित्रपट हा प्री-प्रॉडक्शन टप्प्यात असून लवकरच तो शुटिंग फ्लोअरवर जाणार आहे. हर्षवर्धनचा बहिण रियासोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे.

हा एक रोम-कॉम चित्रपट असला तरी या चित्रपटाची गोष्ट विनोदी असल्याचे सांगण्यात येते. हर्षवर्धनची गंभीर प्रतिमा बदलण्यासाठीच या खास चित्रपटाची योजन आखण्यात आली असल्याचे समजते.

आगामी काळात हर्षवर्धन दिवंगत सत्यजित रे यांनी लिहिलेल्या लघुकथांवर आधारित चार कथा मालिकांसाठी काम करणार आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. चार एपिसोड्सची ही मालिका जीवनाचे विविध रंग पुन्हा जिवंत करताना दिसेल. याचा प्रीमियार २५ जून रोजी होणार आहे.

दरम्यान, निर्माता जय शेवक्रमणि यांच्यासोबत तीन चित्रपटांचा करार असलेल्या अलाया एफने अद्याप तिची पुढील घोषणा केलेली नाही. अभिनेत्रीने सैफ अली खान आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या जवानी जानेमान चित्रपटासाठी अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू महिला प्रकारात फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.

हेही वाचा - HBD विजय थलपती : गर्ल फॅनसोबत लग्न करणारा दाक्षिणात्य सुपरस्टार विजय

ABOUT THE AUTHOR

...view details