महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

स्वातंत्र्यदिनी सुशांतसिंह राजपूतसाठी वैश्विक प्रार्थना सभा - Prayer Meeting for Sushant Singh Rajput on Independence Day

सुशांतच्या दोन महिन्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी त्याची बहीण श्वेतासिंग कीर्ती हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन स्वातंत्र्यदिनी एकत्र येण्याची विनंती केली आहे आणि दिवंगत अभिनेत्यासाठी एकत्रितपणे प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

Global Prayer Meeting for Sushant
राजपूतसाठी वैश्विक प्रार्थना सभा

By

Published : Aug 14, 2020, 9:13 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतची बहीण श्वेतासिंग कीर्ती हिने लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनी दिवंगत सुशांतसाठी एकत्रितपणे प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. सुशांतच्या दोन महिन्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्वेताने शुक्रवारी इंस्टाग्रामवर अशी विनंती करणारी पोस्ट लिहिली आहे.

श्वेताने लिहिले की, "तू आम्हाला सोडून गेलास त्याला आता 2 महिने झाले आहेत आणि त्या दिवशी काय घडले आहे हे शोधण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. सत्याचा प्रसार होईल आणि आपल्या प्रिय सुशांतला न्याय मिळावा यासाठी 24 तास जागतिक प्रार्थनेत सहभागी व्हा.''

यासोबतच तिने सुशांतच्या प्रार्थना सभेविषयी माहिती देणारी एक पोस्टरही शेअर केले आहे. सुशांतचा 14 जून रोजी मृत्यू झाला. सुशांतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे हिनेही लोकांना या जागतिक प्रार्थना सभेत सहभागी होण्यास सांगितले आहे.अंकिताने इंस्टाग्रामवर लिहिले की, “सुशांत तुला जाऊन 2 महिने झाले आणि मी तुला ओळखते. तू जिथे आहेस तिथेच आनंदी आहेस. कृपया उद्या (उद्या 15 ऑगस्टला) सकाळी 10 वाजता आमच्यात सामील व्हा आणि आमच्या प्रिय सुशांतसाठी प्रार्थना करा. "

कंगना रनौत, कृती सेनॉन, वरुण धवन, परिणीती चोप्रा, सिद्धांत चतुर्वेदी आणि जरीन खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सुशांतच्या कुटूंबियांसोबत मिळून सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी त्यांच्या मोहिमेस पाठिंबा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details