मुंबई- अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्राची 'जबरिया जोडी' लवकरच प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सिनेमागृहात येणार आहेत. जबरिया जोडी या त्यांच्या चित्रपटाचा विनोदी ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता चित्रपटातील पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
सिद्धार्थ परिणीतीच्या जबरिया डान्सची झलक, खडके ग्लासी गाणं प्रदर्शित
खडके ग्लासी असं शीर्षक असणाऱ्या या गाण्यात परिणीती आणि सिद्धार्थच्या जबरिया डान्सची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्याला हनी सिंग, अशोक एम आणि ज्योतिका यांनी आवाज दिला आहे.
खडके ग्लासी असं शीर्षक असणाऱ्या या गाण्यात परिणीती आणि सिद्धार्थच्या जबरिया डान्सची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्याला हनी सिंग, अशोक एम आणि ज्योतिका यांनी आवाज दिला आहे. तर तनिष्क बाग्ची आणि अशोक एम यांचं संगीत आहे.
होळीच्या सणादिवशी रंगासोबत खेळत आणि भांग पित ठुमके लगावताना परिणीती आणि सिद्धार्थ या गाण्यात दिसत आहेत. शोभा कपूर, एकता कपूर आणि शैलेश आर सिंग यांची निर्मिती असणारा जबरिया जोडी चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.