मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या लूकपासून ट्रेलरपर्यंत सर्वालाच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
'बेख्याली', 'कबीर सिंग' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित - shahid kapoor
चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बेख्याली' असं या गाण्याचं शीर्षक आहे. या गाण्याला सचेत टंडन यांनी आवाज दिला आहे.
अशात आता चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बेख्याली' असं या गाण्याचं शीर्षक आहे. या गाण्याला सचेत टंडन यांनी आवाज दिला आहे. तर इरशाद कामिल यांनी हे गाणं लिहिलं आहे. यात शाहिद आणि कियाराच्या प्रेमाची खास झलक पाहायला मिळत आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य अर्जून रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा हे करणार आहेत. तर भूषण कुमार, मुराद खेतानी, क्रिशन कुमार आणि आश्विन वर्दे यांची निर्मिती असणार आहे. हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.