मुंबई- नेहमीच वेगळा आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आयुष्मान खुराणा आता आणखी एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. ड्रीम गर्ल या सिनेमातून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता.
राधे राधे, आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल'चं पहिलं गाणं प्रदर्शित - अनू कपूर
चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. राधे राधे असं शीर्षक असलेल्या या गाण्यात आयुष्मान आणि नुशरत भरूचाच्या डान्सची झलक पाहायला मिळत आहे.
यानंतर आता चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. राधे राधे असं शीर्षक असलेल्या या गाण्यात आयुष्मान आणि नुशरत भरूचाच्या डान्सची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्याला मित ब्रोस आणि अमित गुप्ता यांनी आवाज दिला आहे.
राज शाडिल्य यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अनू कपूर आयुष्मानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. नुकतंच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकवलेल्या आयुष्मानला आता या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहतेही आतुर आहेत.