महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इम्रानच्या 'चेहरे'मधील क्रिती खरबंदाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पाहा फोटो - thriller

चेहरे हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. पुढच्या वर्षी २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

'चेहरे'मधील क्रिती खरबंदाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

By

Published : Jul 19, 2019, 5:11 PM IST

मुंबई - चीट इंडिया चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेता इम्रान हाश्मी पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. 'चेहरे' या चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील इम्रानचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता अभिनेत्री क्रिती खरबंदाचाही 'चेहरे'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने इम्रान आणि अमिताभ पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दरम्यान अमिताभ सध्या आपल्या 'गुलाबो सिताबो' चित्रपटाच्या चित्रीकरणाता व्यग्र आहेत.

'चेहरे' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. रूमी जाफरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 'व्हाय चीट इंडिया' चित्रपटाच्या अपयशानंतर इमरानच्या या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details