मुंबई- आयुष्मान खुराणा आणि नुशरत भारुचा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ड्रीम गर्ल' चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमाला चित्रपट विश्लेषकांच्या उत्तम प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे.
पहिल्याच दिवशी 'ड्रीम गर्ल'नं रचला नवा विक्रम, जाणून घ्या कमाई - dream girl box office collection
हा चित्रपट आयुष्मानच्या फिल्मी करिअरमधील बिगेस्ट ओपनर ठरला आहे. आतापर्यंत आयुष्मानच्या 'बधाई हो'नं ७.३५, 'आर्टिकल १५' ५.०२, 'शुभ मंगल सावधान' २.७१, 'अंधाधून' २.७० तर 'बरेली की बर्फी'नं २.४२ कोटींचा गल्ला पहिल्या दिवशी जमावला होता.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.०५ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमानं नवा विक्रम रचला आहे. हा चित्रपट आयुष्मानच्या फिल्मी करिअरमधील बिगेस्ट ओपनर ठरला आहे. आतापर्यंत आयुष्मानच्या 'बधाई हो'नं ७.३५, 'आर्टिकल १५' ५.०२, 'शुभ मंगल सावधान' २.७१, 'अंधाधून' २.७० तर 'बरेली की बर्फी'नं २.४२ कोटींचा गल्ला पहिल्या दिवशी जमावला होता.
याशिवाय 'ड्रीम गर्ल'नं 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक', 'लुका छुपी' आणि 'छिछोरे' या सिनेमांपेक्षाही पहिल्या दिवशी अधिक गल्ला जमावला आहे. अशात आता शनिवार रविवारच्या सुट्टीचा फायदाही कलेक्शनला होणार आहे. त्यामुळे, हा सिनेमा आणखी कोणते नवे विक्रम रचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.