नशेत झिंगलेल्या व्यक्तीवर आतापर्यंत बरेच चित्रपट येऊन गेलेत. आता याच विषयावरच्या आणखी एका सिनेमाची त्यात भर पडणार आहे. 'टिस्पी' असे या चित्रपटाचे शीर्षक असून मुंबईत याचे शूटींग सुरू झाले आहे.
'टिस्पी'चे मुंबईत शूटींग सुरू, दिपक तिजोरी दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत - Filming begins in Mumbai of film Tipsy - directed by Deepak Tijori
'टिस्पी'चे शूटींग मुंबईत सुरू झाले आहे. अभिनेता दिपक तिजोरी हे याचे दिग्दर्शन करीत आहे. इशा गुप्ता, डेजी शाह यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
'टिस्पी'चे मुंबईत शूटींग सुरू
दिपक तिजोरी हा अभिनेता याचे दिग्दर्शन करीत आहे. इशा गुप्ता, डेजी शाह, काइनाथ अरोरा, अलंक्रिता सहाइ आणि नाझिया हसन यांच्या या सिनेमात भूमिका आहेत. राजू चढ्ढा आणि राहुल मित्रा निर्माता असलेल्या या चित्रपटाचे मोहन नाडर सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्याचे माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून दिली आहे.