मुंबई- आशिकी गर्ल श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडी लवकरच छिछोरे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्रीची व्याख्या सांगणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक शेअर करण्यात आली आहे.
लवकरच येणार छिछोरेंचं कॉलेज अँथम, पाहा 'फिकर नॉट' गाण्याचा टीझर - साहो रिलीज डेट
फिकर नॉट असं या गाण्याचं शीर्षक आहे. श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. छिछोरे का कॉलेज अँथम आ रहा हैं, असं कॅप्शन तिनं या टीझरला दिलं आहे.
फिकर नॉट असं या गाण्याचं शीर्षक आहे. श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. छिछोरे का कॉलेज अँथम आ रहा हैं, असं कॅप्शन तिनं या टीझरला दिलं आहे. नितेश तिवारी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात श्रद्धा आणि सुशांतशिवाय वरूण शर्मा, प्रतीक बब्बर आणि इतर कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, नंतर साहोची रिलीज डेटही ३० ऑगस्टच जाहीर झाल्यानंतर नितेश तिवारी यांनी नाराजी व्यक्त करत छिछोरेचं प्रदर्शन पुढे ढकललं. आता हा सिनेमा ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.