महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मेरे अंगने में' गाण्यावर बेफाम होऊन थिरकली जॅकलिन फर्नांडिस - Jacklin Fernandis latest news

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि असिम रियाज याचे होळीचे गाणे 'मेरे अंगने में' रिलीज झाले आहे. नेहा कक्कड आणि राजा हासन यांनी हे गीत गायले आहे.

Jacklin Fernandis
जॅकलिन फर्नांडिस

By

Published : Mar 9, 2020, 7:03 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि 'बिग बॉस १३' चा रनर अप विनर असिम रियाज यांचा 'मेरे अंगने में' हा म्यूझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे.

'मेरे अंगने में' हे गाणे तनिष्क बागची यांनी संगीतबध्द केले आहे. या गाण्याचा व्हिडिओ राधिका राव आणि विनय सप्रू यांनी डायरेक्ट केलाय.

या व्हिडिओत जॅकलिन धडाकेबाज पध्दतीने थिरकताना दिसली आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये असिम हिमांशी खुराणासोबत झळकणार आहे. हा व्हिडिओ १८ मार्चला रिलीज होईल. हे गाणेदेखील नेहा कक्कडने गायले आहे.

बिग बॉसच्या १३ व्या पर्वात असिम रियाजचे सिलेक्शन ५ तास अगोदर झाले होते. त्याने शोमध्ये धमाल उडवून हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details