मुंबई- अभिनेता प्रभासचा 'साहो' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. तेलंगणा आणि आंध्रमध्ये प्रभासचे डायहार्ट फॅन आहेत. दक्षिणेतील राज्यात जेव्हा चित्रपट रिलीज होतो, तेव्हा अभिनेत्यांचे चाहते थिएटर्स सजवतात, उंच कटआऊट लावतात, बॅनरबाजी होते.
प्रभासचे डायहार्ट फॅन्स! कट-आउटला घातला दुधाने अभिषेक - कपिल शर्मा शो
दक्षिणेतील राज्यात जेव्हा चित्रपट रिलीज होतो, तेव्हा अभिनेत्यांचे चाहते थिएटर्स सजवतात, उंच कटआऊट लावतात, बॅनरबाजी होते. अशात प्रभासच्या दाक्षिणात्य चाहत्यांनी त्याच्या कट-आउटला फुलांच्या माळा आणि दुधाचा अभिषेक घातला आहे.
अशात प्रभासच्या दाक्षिणात्य चाहत्यांनी त्याच्या कट-आउटला फुलांच्या माळा आणि दुधाचा अभिषेक घातला आहे. हा सिनेमा देशभरातील जवळपास १० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. यातील २५०० स्क्रीन्स या तेलुगू भाषिक क्षेत्रांमधील आहेत.
याशिवाय हिंदी भाषिक राज्यांतही या चित्रपटाचं प्रदर्शन झालं आहे. हिंदी प्रेक्षकांसाठी प्रभास आणि श्रद्घाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरीदेखील लावली होती. गुरुवारीच साहोचे पोस्टर लावण्याचे काम तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर येथील तिरुमाला थिएटरमध्ये सुरू होते. त्यावेळी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.